नाशिकच तापमान घटलं मात्र नगरपंचायत प्रचार तापला!

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी आणखी एक दिवस वाढवण्यात आला असून आजच्या दिवशी प्रचार करता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सहा ठिकाणी नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने चोख तयारी केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या प्रचारासाठी आजचा आणखी एक दिवस वाढवला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून आज रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी दिली आहे.

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड या सहा ठिकाणी नगरपंचायत निवडणूक होत आहे. या सहा नगरपंचायतीच्या ८७ जागांसाठी २९२ उमेदवार रिंगणात असून उद्या जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी या सहा नगरपंचायत निवडणुकांत महाविकास आघाडीत फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार आहे.