शिक्षकानेच विद्यार्थ्यांच्या व्हाट्सपवर पाठवला पेपर

मुंबई । प्रतिनिधी

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेदरम्यान (Maharashtra Board HSC Exam) रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची (Chemistry Paper Leaked) घटना समोर आली आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिक क्लासेसच्या शिक्षकास अटक केली आहे. या शिक्षकाने इयत्ता बारीवी बोर्ड परीक्षेचा पेपर आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यात पाठीमागील काही काळापासून पेपरफुटीची बरीच प्रकरणे पुढे आली आहेत. ही प्रकरणे नोकरभरती संबंधित होती. मात्र, आता त्या श्रृंखलेत बोर्ड परीक्षाही आल्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मुकेश यादव असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेपूर्वीच पेपर या शिक्षकाच्या मोबाईल वर आला होता. हा पेपर या शिक्षकाने आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. क्लासमध्ये शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविण्यात आला. केमेस्ट्री (रसायनशास्त्र) या विषयाचा पेपर शनिवारी झाला. मात्र, तत्पूर्वीच या शिक्षकाने हा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे.

कोचिंग ऑपरेटर यादवने परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्याच्या तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर पाठवला होता, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीच्या परीक्षेतही सावळागोंधळ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.