तुम्हाला आधारकार्डवरील फोटो बदलायचा आहे? जाणून घ्या सोपी ट्रिक

नाशिक । प्रतिनिधी

आधार कार्ड आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून आधार कार्ड भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. पण, अनेकदा आधार कार्ड वरील फोटो चांगला नाही अशी अनेकांची तक्रार असते.

तुम्हीही त्यापैकी एक असाल आणि तुम्हालाही तुमच्या आधार कार्डवरील फोटो आवडला नसेल, तर आता तुमच्याकडे तो बदलण्याचा पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला एक सोप्पी ट्रिक सांगत आहोत.ज्याद्वारे, तुम्ही आधार कार्डवरील तुमचा सध्याचा फोटो कोणत्याही अडचणीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय सहजपणे बदलू शकता.

यासाठी, प्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट मधील आधार मिळवा विभागात जाऊन आधार नोंदणी फॉर्म किंवा सुधारणा/अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आधार कायमस्वरूपी नोंदणी केंद्रात बसलेल्या कार्यकारिणीला द्या. यानंतर आता तुम्हाला तुमची बायोमेट्रिक डिटेल्स एक्झिक्युटिव्हला द्यावी लागतील. जर तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करायचा नसेल तर तुम्हाला तो केंद्रावरही मिळेल.

त्यानंतर, आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे लाईव्ह पिक्चर क्लिक करेल. फोटो बदलण्यासाठी तुम्हाला केंद्रावर २५ रुपये भरावे लागतील. ज्यामध्ये, कराचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला एक स्लिप मिळेल. ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. तुम्ही URN वापरून आधार कार्डची अपडेटेड स्थिती तपासू शकता.

आधार कार्डमध्ये तुमचा फोटो अपडेट केल्यानंतर तुम्ही आधार ऑनलाइन डाउनलोड करू शकता. अपडेट केलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला UIDAI पोर्टलला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही कोणतेही सामान्य आधार कार्ड किंवा मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करणे निवडू शकता आणि ते डाउनलोड करू शकता.