तयारी साहित्य संमेलनाची

नाशिकला हाेणाèया ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सर्वस्तरावर तयारीने माेठा वेग घेतला आहे. या निमित्ताने संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही सुरवात आज ‘मी व माझ्या कविता’ या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमानी हाेत आहे. त्यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे नाशिक येथील प्रकाशन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ, प्राचार्य मिलींद जाेशी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते हाेत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

कलाकारांचा वाढता सहभाग या संमेलनामध्ये मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दाेन पावले मागे यावर मुख्य मंडपामध्ये दिनांक ४ डिसेंबर २०२१ राेजी सायं. ५.३० वा. परिसंवाद हाेत आहे.

या परिसंवादामध्ये एक वक्ता या नात्याने लाेकप्रिय खासदार व कलाकार डाॅ. अमाेल काेल्हे हेही सहभागी हाेत आहेत. श्री. शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या परिसंवादामध्ये सर्वश्री निर्माता, दिग्दर्शक व अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी, निर्माता, दिग्दर्शक व अभिनेते सुबाेध भावे, नेपथ्यकार प्रदीप मुळे, साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त प्राजक्त देशमुख, पराग घाेंगे, डाॅ. सतिश साळुंके हे वक्ते म्हणून सहभागी हाेत आहेत. सिनेनाट्य व कलाक्षेत्रातील सर्व मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी नाशिककर उत्सूक झाले आहेत.

या संमेलनामध्ये सिक्किमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्री. श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथ प्रदर्शन – या निमित्ताने हाेणाèया ग्रंथ प्रदर्शनासाठीचे नियाेजित २०० स्टाॅल्स् पूर्ण आरक्षित झाले असून सातत्याने त्या बाबत महाराष्ट्राच्या कानाकाेपèयातून विचारणा हाेत असल्याने अधिक स्टाॅल्स् देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. स्वागत समितीचे सभासद हाेण्यासाठीही नाशिककर आर्वजून पुढे येत आहेत. तसेच प्रतिनिधींची संख्याही वाढत असून बाल कुमार मेळावा, कविकट्टा आदी मध्ये भाग घेण्यासाठी सतत विचारणा येत आहेत.