Home » नाशिकच्या स्वयंम पाटील मिळाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

नाशिकच्या स्वयंम पाटील मिळाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक येथील स्वयम पाटील या १४ वर्षाच्या विद्यार्थ्याला ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार जाहीर झाला आहे. स्वयमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे स्वयम पाटीलला प्रमाणपत्र देवून सन्मानित केले.

नाशिकच्या राणेनगर येथील रहिवासी आणि डाउन सिंड्रोमसारख्या आजारावर मात करून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदविणारा जलतरणपटू स्वयम पाटील याला यंदाचा प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. आज सोमवारी (ता. २४) सकाळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी त्याचे कौतुक केले.

दरम्यान देशभरातील विविध गटांत इतर बालकांना प्रेरणादायी ठरतील अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. स्वयमला क्रीडा क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शारीरिक व्याधींवर मात करत स्वयमने फुलविलेल्या जलतरणातील देदीप्यमान कारकीर्दीबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे. यापूर्वीदेखील त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१८ ला त्याला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आई विद्या आणि वडील मिलिंद पाटील यांनी स्वयमच्या आजाराचे दुःख न बाळगता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जलतरणपटू घडवून दाखविले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पुरस्कारप्राप्त बालकांशी संवाद साधणार आहेत. त्यात स्वयम‌चाही समावेश असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही सगळी व्यवस्था केली जाणार असल्याचे समजते. दूरदर्शनवर दुपारी एकपर्यंत हा सोहळा लाइव्ह असणार आहे.

मला पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. यापुढे मला पॅरा ऑलम्पिक मध्ये सहभागी होऊन गोल्ड पदक मिळवायचे आहे. – स्वयंम पाटील, पुरस्कार विजेता

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!