नाशकातील अपघातांनंतर एसटी प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

नाशिक : शहराने अशात भयंकर अपघात अगदी जवळून पाहिले आहे. दोन महिन्यांपूर्वी ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावर झालेला बसचा भयंकर अपघात..तो अग्नितांडव..आक्रोश..धावाधाव, जाळून खाक झालेली बस आणि त्या भस्मसात झालेल्या बसच्या उरल्यासुरल्या भागांमध्ये अडकलेले मृतदेह.. ते सर्व नाशिककरांसाठी ताजच होतं की काल असाच एक अपघात सिन्नर महामार्गावर झाला. थोडक्यात पुनरावृत्ती टळली. या अपघातात पहिल्या घटनेच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. मात्र तारीख तीच होती. डिसेंबर.

काल पळसे गाव चौफुलीवर झालेल्या अपघाताने ८ ऑक्टोबरच्या घटनेची आठवण करून दिली. बसचे ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले असे बस चालकाचे म्हणणे आहे. त्यामुळे बस पुढील एका बसवर आदळली. दरम्यान भरदाव बुससोबत २ दुचाकीस्वार फरफटत आले आणि ते दोघेही चिरडले गेले. दरम्यान वारंवार बसचे होणारे अपघात या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या अपघातांमध्ये एस.टी बसच्या अपघातांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे एस.टी. बसचा प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या अपघातानंतर अपघात वाढण्यामागचे कारणं काय याची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये एकट्या नाशिक विभागात १२० तर राज्याभ्रमध्ये एकूण १५०० च्या आसपास अपघात घडल्याचा आकडा समोर आला आहे आणि अधिकाधिक अपघात हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती आहे. कालचाही अपघात बस फेल झाल्यामुळे झाल्याचे चालक, कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शिंकडून सांगण्यात येत आहे.

या अपघातांची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. रस्ता परिस्थितीकडे दुर्लक्ष, चालकांचा वाहनावरील ताबा सुटणे, अचानक रस्त्यात कोणीही चुकीच्या पद्धतीने ट्राफिकच्या नियमांना धाब्यावर बसवून आडवे येणे, त्याचबरोबर एक महत्वाचे कारण म्हणजे वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे होणारे अपघात. त्यामुळे वाहनाची देखभाल करणे किती महत्वाचे आहे हे स्पष्ट होते.

एस.टी बसच्या अपघातांच पाहिलं तर कोरोना काळात बससेवा ठप्प होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाल्याने बस आगारात पडून होत्या. यानंतर जेव्हा बस सुरु झाल्या तेव्हा त्यांची देखभाल होणे गरजेचे होते मात्र ती झाली नाही असं देखील म्हंटल जात आहे. त्यासोबतच बस दुरुस्तीसाठी लागणारी स्पेअरपार्ट देखील उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रवासीच नाही तर वाहन चालक, वाहकांचा देखील जीव धोक्यात आहे. म्हणून बसची देखभाल राखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहेत.