नाशकात पावसाचा तांडव; ३ जणांचा मृत्यू, नदीत अडकली प्रवासी बस

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशकात हाहाकार माजला असून एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाने रात्री रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे घराची भिंत पडून दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील वंजारवाडी गावात घडली असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाशकात पावसाचा हाहाकार

नाशकात रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाचे प्रमाण इतके होते की अवघ्या तासाभरात शहरातील रस्ते आणि नद्या मध्ये गच्च पाणी भरले गेले. तसेच शहरात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणत झाली होती. प्रचंड पाणी साचलेल्या रस्त्यातून वाट काढत नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी पावसाचा चांगलाच फटका नागरिकांना बसला आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते मात्र पावसाचा तांडव हा सुरूच होता.

धरणातून पुन्हा विसर्ग

नाशिक मध्ये काल रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले आहे. धरणातून २५०० क्युसेक ने विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथड्या भरून वाहत आहे. गोडघाटेवर अनेक मंदिर पाण्याखाली गेली असून गंगेचा रौद्र अवतार पाहायला मिळत आहे.

अनेक दुर्घटना

त्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशकात हाहाकार माजला असून अनेक दुर्घटना झाल्या आहेत. कालचा रात्रीचा पाऊस तीन जणांच्या जीवावर बेतला असून त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. पावसाने रात्री रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे घराची भिंत पडून दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील वंजारवाडी गावात घडली आहे.

तर नाशकातील मुंबई नाका परिसरातील पखाल रोडवर एका सायकलस्वार रस्त्यावरून जात होता, रस्त्यावर पाणी साचले होते, दुर्दैवाने त्या पाण्यात करंट उतरला असून या सायकलस्वारास तो करंट लागून याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

गोदाघाटेवर अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली बस

गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे गोदा घाट परिसरात पूर आला. अचानक पाणी वाढल्याने ही खासगी बस पाण्यात अडकून पडली. सुदैवाने बस रिकामी होती. कुणी प्रवासही बसमध्य नसल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता. रात्री ही बस काढण्यासाठी बस काढण्याचे प्रयत्न सुरु होते. रात्री जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र काही केल्या यश मिळाले नाही, आज सकाळी बस बाहेर काढण्यात यश आले आहे.