राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा ? राऊतांचे सूचक ट्विट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची बातमी समोर येताच संजय राऊतांनी एक सूचक ट्विट केले आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा जवळच्या व्यक्तींकडे व्यक्ती केली असल्याची माहिती आहे. यावर ‘राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट.’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

या ट्विटमध्ये संजय राऊत पुढे म्हणतात, ‘राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!’. राज्यपालांच्या पदमुक्त होण्याचे संकेत येताच संजय राऊतांनी हे ट्विट केले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याचे संकेत त्यांनी स्वतः दिल्याची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात राज्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा जवळच्या व्यक्तींकडे केली असल्याची माहिती आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ((Governor Bhagat Singh Koshyari)) हे अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. शिवरायांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी २ वेळा वादग्रस्त वक्तव्य केले. सावित्रीबाई फुले यांच्याबाद्द्लही बोलताना राज्यापालंची जीभ घसरली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल केलेले वक्तव्य देखील राज्यपालांना चांगलेच भोवले होते. आताही शिवाजी महाराजांबद्दल दुसऱ्यांदा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात असंतोष पाहायला मिळाला. अजूनही त्याचे पडसाद उमटत आहे. आज नाशिकमध्ये विराट हिंदू मूक मोर्चामध्ये देखील शिवरायांविरोधात केलेल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले दिसले.

दरम्यान, आता या सर्व घडमोडी घडत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांचा पदभार त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात यावा अशीही इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केली असल्याची वृत्तवाहिन्यांची माहिती आहे. तेच आपल्याला पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा आहे. असे देखील त्यांनी म्हंटले आहे. राज्यपालांनी ही इच्छा समोर येताच र ‘राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट.’ असं ट्विट राऊतांनी केले आहे.