रवींद्र जडेजा ‘चेन्नई सुपर किंग्स’ सोडणार?

By चैतन्य गायकवाड

भारताचा स्टार अष्टपैलू (all-rounder) क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या खूपच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारणही तसं वेगळच आहे. कारण रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) (CSK) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यातच भर म्हणजे रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून (social media account) सीएसकेच्या संबंधित गेल्या तीन वर्षातील सर्व पोस्ट काढून टाकल्या आहे. यावरून रवींद्र जडेजा आणि सीएसके फ्रेंचाईची यांच्यातील संबंध बिघडल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे रवींद्र जडेजा सीएसकेला रामराम करणार का? हा प्रश्न आता तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

यंदाचे आयपीएल (IPL) देखील रवींद्र जडेजासाठी खूपच निराशा जनक होते. महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Sing Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार पद सोडल्यानंतर, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी रवींद्र जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र रवींद्र जडेजा कर्णधार म्हणून तसेच खेळाडू म्हणून देखील फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर रवींद्र जडेजाने मध्येच कर्णधार पद सोडले होते. त्यानंतर पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधार पद सुपूर्द करण्यात आले होते. एवढेच नाही, तर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे सीएसकेच्या उर्वरित सामन्यांमधून देखील बाहेर झाला होता. तसेच रवींद्र जडेजाच्या या सोशल मीडियावरील कृतीने तो सीएसके मधून बाहेर पडणार का, ही चर्चा सुरू आहे. तसेच आयपीएलचा पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी रवींद्र जडेजा लिलावात उतरण्याची देखील शक्यता आहे.

महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा नाही
रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मैत्रीची चर्चा नेहमीच सुरू असते. मात्र चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. परंतु रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे धोनी आणि जडेजामध्ये काहीतरी बिनसले का, अशा चर्चा सुरू झाल्या आहे.