अबब ! आलं पार्सल अन, त्यात निघाला कोब्रा..

आपण मागविलेली वस्तू कुरियर ने घरी आली की, कधी तिला उघडून बघतो अशी आपली स्थिती होते.

मात्र आलेल्या कुरियर च्या बॉक्स मध्ये जहरी कोब्रा जातीचा साप निघाला तर तुमची स्थिती काय होईल. कुरियर मध्ये साप म्हंटल तरी अंगावर काटा उभा राहतो.पण अशीच एक घटना नागपूर मध्ये घडली आहे.. 

ज्ञानेश्वर नगरात सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखाटे पत्नी सोबत राहतात त्यांची मुलगी बंगलोरमध्ये नोकरीच्या निमित्ताने राहते दीड वर्षांपूर्वी वर्क फ्रॉम होम मुळे ती नागपुरात आली तिने आपले सामान आपल्या सहकारी मैत्रिणी घरी ठेवलं होतं मात्र वर्क फॉर्म होम संपण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या मुलीने आपलं सामान कुरियर च्या माध्यमातून नागपूरमध्ये मागविले सात ते आठ बॉक्स तसेच कंटेनर ने  सामान मागविले सामान नागपूर मध्ये पोहोचल्यानंतर कुरिअर कंपनीने हे सामान आपल्या वाडी येथील गोडाउन मध्ये काही दिवस ठेवले होते त्याची डिलिव्हरी सोमवारी रात्रीच्या वेळी लखाटे कुटुंबीयांना दिली, मुलगी बॉक्स उघडून सामान पाहत असताना तीन ते चार बॉक्स मध्ये त्यांचं सामान होतं मात्र एका बॉक्समधून फुत्काराचा आवाज येत असल्यामुळे कुटुंब घाबरले होते.

त्यांनी लाकडाच्या मदतीने बॉक्स उघडला असता त्यात भलामोठा पाच फुटांचा नाग होता. बॉक्स उघडताच नाग सरसर निघून गेला हा नाग विषारी कोब्रा जातीचा असल्याचा तेथील नागरिकांचं म्हणणं होतं सुदैवाने नागाने कोणालाही चावा घेतला नाही मात्र इथून पुढे तुमच्याकडे कुरियर आलं तर ते कुरियर उघडताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे..