मालेगाव दंगल प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

शुक्रवारी त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती.या बंद दरम्यान हिंसाचार झाला होता त्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे. याच धर्तीवर मालेगाव शहरातील रझा अकॅडमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून कार्यालयाची झडती घेतली यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.जवळपास दोन तास ही झडती सुरू होती.

त्रिपुरा हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी रझा अकॅडमी ने मालेगाव बंदची हाक दिली होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड करण्यात आली होती.दरम्यान या हिंसाचार मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळे 4 गुन्हे दाखल केले असून त्यात रझा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.आता पर्यंत पोलिसांनी 35 संशयितांना अटक केली आहे.या दंगलीची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मालेगाव मध्ये ठाण मांडून बसले आहेत.