बॉईज टाऊन शाळेत बालदिनाची धूम !

“लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ||” या उक्तीप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिवस ’ १५ नोव्हेंबर या दिवशी बॉईज टाऊन शाळेत सद्यस्क स्वरुपात जल्लोषात साजरा करण्यात आला.

‘मुले ही देवाघरची फुले’ असे मानणार्‍या पंडितजींचे लहान मुलांविषयी असलेले प्रेम व जिव्हाळा भाषणाद्वारे व्यक्त करण्यात आला . तसेच शाळेतील शिक्षकांनी सद्यस्क शाळेतील विद्यार्थ्यांच्या गमती-जमतींचा अभिनय करत विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यासाठी सुंदर नाटिका सादर केली. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी उद्युक्त करणारे प्रेरणा गीत व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखविण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ व शाळेचे पर्यवेक्षक श्री. मुसळे , श्रीमती संवत्सरे व श्रीमती ठक्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.