पंधरा दिवसापुर्वी निफाडहुन निघालेले मायलेक नाशिकला पोहोचलेच नाही!

नाशिक | प्रतिनिधी

निफाड येथून नाशिकला निघालेल्या दोघे मायलेक बेपत्ता झाले असून याबाबत निफाड पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

अर्चना रघुनाथ नवले (३५), चेतन रघुनाथ नवले (१२) अशी या मायलेकांची नावे आहेत. हे दोघे निफाड नजीक असलेल्या कोठूर फाट्याहून नाशिकला निघाले होते. मात्र पंधरा दिवस उलटून गेले अद्याप ते नाशिकला पोहचले नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

https://youtu.be/wtm_3jv-iUE

नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला आहे. मात्र अद्याप या मायलेकाचा शोध लागलेला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात निफाड पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्यात आली असून पोलीस या मायलेकाचा शोध घेत आहेत. त्यामुळे जर कोणाला आई आणि हा मुलगा दिसल्यास त्वरित निफाड पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.