Video : मनमाडला ऑन ड्युटी पोलिसावर चॉपरने जीवघेणा हल्ला

नाशिक | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. आता थेट ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांवर देखील हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे.

https://youtu.be/ZbDFcm_2nNw

बुधवारी मनमाड येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरज उगलमुगले असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, वारंट बजाविण्यासाठी पोलीस कर्मचारी उगल मुगले यांच्यासोबत आणखी एक दोन पोलीस गेले होते. यावेळी पोलिसांवर तीन जणांच्या टोळीने चॉपरने पोटावर वार केले. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी उगलमुगले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान तीन जणांच्या टोळीने हा हल्ला केला असून हल्ला करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी एक संशयित आरोपीला अटक केली असून दोन जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.