Photo : संमेलनाची हाऊस, पण त्यात पडतोय पाऊस…!

नाशिक | प्रतिनिधी
एकीकडे साहित्य संमेलनाला सुरवात होत असताना आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे संमेलनस्थळी पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे ऐन उदघाटनाच्या आदल्या दिवशी पावसाने खोडा घातला आहे.

दरम्यान आज सकाळपासून नाशिकसह जिल्हाभरात पाऊस सुरू आहे. त्यातच संमेलनाने उभारी घेतली असून उद्यापासून संमेलनस्थळी गर्दीचा महापूर येणार आहे. मात्र हा महापूर येण्याआधी संमेलन स्थळी पावसाने आगमन केले आहे.

त्यामुळे येथील मुख्य सभामंडपात पाणी साचले असून छतावरून पाणी साचून खाली येत आहे. तर अनेक कार्यक्रम हे मोकळ्या जागी असल्याने येथील तयारीवर पावसाने पाणी फेरले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नुकतीच पाहणी केली असून आता यावर काय उपाययोजना करण्यात येतात हे पहावे लागणार आहे.