कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या मदतीचं काय झालं?

नाशिक । प्रतिनिधी

कोरोना मुत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाना चार लाख रूपये देऊ अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती, मात्र आता या घोषणेचा केंद्राला विसर पडलेला आहे. या कुटुंबीयांना तात्काळ चार लाखांची मदत द्यावी अशी मागणी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोना काळात लाखो कुटुंबियांनी आपल्या घरातील कर्ता, कमविता व्यक्ती गमावला आहे. कोणी आई-वडील, कोणी मुलगा, मुलगी गमावली आहे. अनेक लहान मुले तर पोरकी झाली आहेत. यामुळे या कुटुंबियांसमोर आता भविष्याचे संकट उभे ठाकले आहे. या करीत केंद्र सरकारने या कुटुंबासाठी चार लाखांच्या मदतीचे आश्वासन दिले होते. यामुळे आहे. मात्र अद्याप हि घोषणा कागदावरच असल्याचे मत मंत्री थोरात यांनी सांगितले. यात पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज्य सरकारनेही यातील आपला २५ टक्के हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असेही थोरात यांनी सांगितले आहे.

दरम्यान कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले होते. यावर न्यायालयात सदर कुटुंबियांना चार लाखांची करण्यात यावर्षी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर कोर्टाने आपात्कालीन व्यवस्थापन कायद्यातील कलम 12अन्वये ही मदत देण्यात यावी असे प्रशासनाला सांगितले होते. मात्र यावर स्पष्टीकरण देतांना केंद्र सरकारने म्हटले होते कि, कोरोना विषाणूमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही. कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यात फक्त भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्यांनाच मदत करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या मदतीबाबत अद्यापही काही ठोस निर्णय झाला नसल्याचे दिसून येत आहे.