साडीचा पदर गिरणीत अडकल्याने महिलेचा मृत्यू

चांदवड । प्रतिनिधी
चांदवड तालुक्यातील निंबाळ येथील महिलेचा साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगला भगवान दरेकर (४८) असे या महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, मंगला दरेकर यांची स्वतःची पिठाची गिरणी आहे. नेहमीप्रमाणे त्या पिठाची चक्की चालू करून दळण दळण्यासाठी सुरवात केली. यावेळी काम सुरु असतांना अचानक साडीचा पदर हा चक्कीच्या इलेक्ट्रिक मोटरच्या बेल्टमध्ये अडकल्याने त्यांचा गळ्याला फास लागला. मात्र काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक पवार व पोलीस कर्मचारी बस्ते हे तपास करीत आहे.