मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित पत्रिका जाहीर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी अखेर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर, मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. याचबरोबर तीन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असून याबाबतची जय्य्त तयारी आयोजकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून नुकतीच कार्यक्रमाची पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ३ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन तर ५ डिसेंबरला संमेलनाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच विविध राजकीय नेत्यांची हजेरी संमेलनाला असणार आहे.

या तीन दिवसांत विविध कार्यक्रम आयोजित केले असून यामध्ये परिसंवाद, परिचर्चा, कविकट्टा, बाळ साहित्य मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची मेजवानी असणार आहे.

कार्यक्रम पत्रिका
३ डिसेंबर
: सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँड पर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नाॅलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजाराेहणाचा कार्यक्रम महामंडळाचे तसेच संमेलन पदाधिकारी, स्वागत समिती सदस्य तसेच निमंत्रित. साहित्यिक, रसिक आदींच्या उपस्थिती हाेणार आहे.

४ डिसेंबर : सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डाॅ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डाॅ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात येताे. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनाेहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. याचबरोबर कविकट्टा, बाल साहित्य मेळावा, कथाकथन, परिसंवाद.

डिसेंबर : सकाळी ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दाेन पावले मागे’ शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या या परिसंवादामध्ये वक्ते श्रीमती लता नार्वेकर, पराग घाेंगे, डाॅ. सतीश साळुंके, सुबाेध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे. याचबरोबर इतर विषयांवर विविध परिसंवाद, कविसंमेलन, समारोप.