नाशिक | प्रतिनिधी
आफ्रिकेच्या माली या देशातून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील त्या १२ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी पश्चिम आफ्रिकेतून नाशिकमध्ये कामानिमित्त आला होता. यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. खबरदारी म्हणून प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील नागरिकांची कोरोना चाचणी केली होती.
दरम्यान त्या १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. आफ्रिकेतून आलेल्या या कोरोनाबधित इसमावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोना चाचणी अहवालानंतर या रुग्णांचा ओमायक्रॉन चाचणी रिपोर्ट पुणे येथील लॅबला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे.