आधी लग्नात गोळ्या चालवल्यामुळे तर आता गुजरात निवडणुकीमुळे रिवाबा-रवींद्र जाडेजाची जोडी चर्चेत

Gujrat Assembly Election : भारतीय ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा लाखो लोकांच मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Elections) भाजपाने रिवाबाला जामनगर उत्तरमधून उमेदवारी दिली होती. रिवाबा या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय झाली आहे. रिवाबाच्या या विजयात रवींद्र जाडेजाचेही तितकच योगदान असल्याचे म्हंटले जात. त्याने पत्नीच्या विजयासाठी दिवस-रात्र एक करत प्रचार केला आहे. रवींद्र जाडेजा सध्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. त्यामुळे या काळात त्याने पूर्ण ताकत पत्नीच्या निवडणुकी प्रचारासाठी लावली.

दोघांच्या लव्ह स्टोरीची नेहमी चर्चा

गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत या जोडप्याच (Ravindra Jadeja And Rivaba Jadeja) एक वेगळं बॉन्डिंग दिसून आलं. मात्र या दोघांच्या लव्ह स्टोरीची किंवा बॉन्डिंगची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. त्यांची चर्चा लग्नात गोळ्या चालवण्यावरूनही झाली होती. रीवाबा जाडेजाच्या बहिणीची मैत्रीण आहे तो तिच्या प्रेमात पडला आणि तिथून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. रिवाबा रवींद्रची बहिण नैनाची मैत्रीण होती. त्याच नैना ज्या गुजरात निवडणुकीत परस्पर विरोधी लढल्या. एका पार्टीमध्ये रवींद्र जाडेजा आणि रिवाबाची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांनी परस्परांना एकमेकांचे नंबर दिले. तिथूनच दोघांच्या प्रेमकथा रुळावर आली. पहिल्या भेटीनंतर दोन महिन्यात दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले. जाडेजाच्या लग्नात गोळ्या चालवून सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. म्हणून पोलिसात त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती.

निवडणुकांमध्ये एका कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने ; कधी काळी जिवलग मैत्रिणी असलेल्या रीवाबा-नैना निवडणुकीच्या मैदानात मात्र विरोधक

निवडणुकांमध्ये एका कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आणि त्यातून एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप देशाने बऱ्याचदा अनुभवले आहेतच. गुजरात निवडणुकीमध्ये देखील चित्र होते. कधी काळी मैत्रिणी असणाऱ्या रीवाबा आणि नैना गुजरात निवडणुकीत आमने सामने विरोधक म्हणून उभ्या होत्या. दरम्यान रवींद्र जाडेजाची बहिण आणि काँग्रेसच्या उमेदवार नयनाबा यांनी (Ravindra Jadeja’s sister and Congress candidate Nainaba) भाजप उमेदवार असलेल्या त्यांच्या वहिनी रिवाबा जाडेजा यांच्यावर (Rabindra Jadeja’s wife and BJP candidate Rivaba Jadeja) हल्लाबोल केला होता. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी रिवाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे, असा आरोप नयना यांनी केला होता.