Home » नाशिकमधील ‘हा’ रस्ता आजपासून १०५ दिवसांसाठी बंद

नाशिकमधील ‘हा’ रस्ता आजपासून १०५ दिवसांसाठी बंद

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामांसाठी शहरात वेग घेतला असून आता शहरातील मध्यवर्ती भागातील अत्यंत महत्त्वाचा असलेला वाहतुकीचा त्र्यंबक नाका ते मायको सर्कल पर्यंतचा रस्ता टप्प्याटप्प्याने तब्बल १०५ दिवसांकरता आज शुक्रवारपासून बंद करण्यात येत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय समोरून तरण तलावा मार्गे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याची उजवी बाजू खोदली जाणार आहे. सरकार वाडा पोलीस ठाणे हद्दीतील वर्दळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला त्र्यंबकनाका ते मायको सर्कल पर्यंतचा रस्त्यावर उजव्या बाजूने खोदकाम केले जाणार आहे.पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठ्या व्यासाची फायदे खाली उतरविण्यात आले आहे. यामुळे शहर वाहतूक नियंत्रण याबाबतची अधिसूचना पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून गुरुवारी जाहीर केली.

या रस्त्यावर पहिल्या पाच टप्प्यांमध्ये हे विकास काम पूर्ण केले जाणार आहे. त्या त्र्यंबक नाका ते ईदगाह मैदानापर्यंत (२० दिवसांकरता) रस्त्याची उजवी बाजू ठक्कर बाजार बस स्थानकाच्या दिशेने वाहतूक बंद केली जाणार आहे. दुसरा ठक्कर बाजार चौक ते जिल्हा शासकीय रुग्णालय पर्यंत (१५ दिवस), तिसऱ्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय ते तरणतलाव सिग्नल (३० दिवस), चौथ्या टप्प्यात तरण तलाव ते थेट वेद मंदिर धामणकर कॉर्नरपर्यंत (२० दिवस) पाचवा अन अखेरच्या टप्प्यात वेद मंदिर ते मायको सर्कलपर्यंत (२० दिवस) जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

या रस्त्यावर अपघात घडले असते. या स्मार्ट सिटी जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे सर्व निर्बंध पोलीस वाहने रुग्णवाहिका अग्निशमन दलाची वाढ यांना देखील लागू राहणार आहे.

असे असणार निर्बंध

त्र्यंबकनाका – मायको सर्कलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याच्या उजव्या बाजूने जलवाहिनी करता खोदकाम करण्यात येणार असल्याने प्रवेश बंद राहणार आहे. मायको सर्कल कडून जमत ना त्याकडे येणारी वाहतूक विरुद्ध बाजूने सुरू राहणार आहे. आज पर्यायी मार्ग असणार आहे. यामुळे या मार्गावरील एक मर्यादा देखील कमी करण्यात आली आहे. रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूस एक ते पाच दिवसांत करतात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!