बुधवारी समता परिषदेचे ‘नो रिजर्व्हेशन,नो इलेक्शन’

नाशिक । प्रतिनिधी

ओ.बी.सी. समाजाला हक्काचे आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांनाही निवेदन देण्यात येणार आहे.

“नो रिजर्व्हेशन,नो इलेक्शन” ही भूमिका समता परिषदेने घेतली आहे. तसेच केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात इम्पेरीकल डाटा देण्यात टाळाटाळ करत आहे. केंद्र सरकारने ओ.बी.सी समाजाचे हक्क डावलण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ बुधवार दि. २२ डिसेंबर रोजी स.११ वाजता समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात येणार आहे. त्याचवेळी तालुक्यातील प्रत्येक तहसीलदारांना हि निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, संतोष डोमे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांनी केले आहे.