टोमॅटोच्या नावाखाली विदेशी मद्याची वाहतूक, दोघांना अटक

नाशिक । प्रतिनिधी

३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर असलेल्या मद्याची वाहतूक करतांना दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख ९७ हजार किमतीचे विदेशी मद्य, मोबाईल, तसेच पिकअप वाहन असा सुमारे १५ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने केली.

नाशिक विभागाचे विभागीय ओहळ, जिल्हा अधीक्षक उपायुक्त श्री. अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकास, त्र्यंबक परिसरातून काहीजण बेकायदा दादरा नगर हवेली – सिल्वासा बनावट मद्याची अवैधरित्या चोरटी वाहतूक करून मद्याची देवाण-घेवाण करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावर पथके पाळत ठेवून होती. दरम्यान या भागात एक पिकअपची हालचाल संशयास्पद वाटल्याने तिचा पाठलाग केलं.

यावेळी पिकअप कच्च्या रस्त्याने पथकाला चकमा देत होती. मात्र काही तासांत या पिकअप ला ताब्यात घेतले. यात टोमॉटो कॅरेटच्या आड विदेशी मद्याची वाहतूक करण्यात येत होती. यातील अनेक कॅरेटमध्ये विदेशी मद्य आढळून आले. त्यामुळे सदर वाहनासहन मुद्देमाल जप्त केला. त्याचबरोबर पिकअप वाहनातील दोघांना ताब्यात घेतले आहे. किशोर काशिनाथ मोरे (रा. पंचवटी), दीपक राजू नाईक (त्र्यंबकेश्वर) या दोघांना अटक केली आहे.

दरम्यान ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या अवैध मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हि कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल्वासा प्रदेशातील महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले दारू जप्त केली. पिकप गाडी मधून सहा लाखाची तब्बल ११२ बॉक्स दारू गाडी असा जवळपास पंधरा लाखाचा माल राज्य उत्पादन शुल्क आणि हस्तगत केला आहे. या अवैध दारू तस्करांनी गाडीच्या मागे टोमॅटोचे कॅरेट ठेवून आत मध्ये दारू विक्रीसाठी आणली होती. मात्र गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क त्र्यंबकेश्वर तळवाडे ग्रामीण भागातून ही कारवाई केली आहे..