धक्कादायक! सातपुरमध्ये धमकी देत महिलेवर अतिप्रसंग

नाशिक । प्रतिनिधी
सातपूर येथील राजवाडा वस्तीत राहणाऱ्या संशयिताने एका महिलेला वेळोवेळी धमकी देत जबरदस्तीने अतिप्रसंग करत बलात्काराची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझाद शेख असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, (दि.१७) रोजी रात्री ११ च्या सुमारास संशयित आरोपी आझाद अख्तर शेख याने पिडीतेला चाकूचा धाक दाखवत तिच्या लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिला नाशिकच्या त्रंबक रोडवरील एका लॉजिंग हॉटेलवर रात्रभर नेऊन बलात्कार केला.

तसेच त्याने आपला मित्राच्या घरी घेऊन जावुन पिडीतेवर अतिप्रसंग करित बलात्कार केला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर संशयित आरोपी हा रेल्वेचे तिकिट काढून पळून जाण्याच्या बेतात असताना सातपूर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

सातपूर पोलिस ठाण्यात ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम जाधव करीत आहेत. याविषयी अधिक माहिती सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली.