नाशिक | प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच निधन झाले असून त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
प्राचार्य विलास औरंगाबादकर यांनी सन २००८ पासून सावानाची विविध पदे भूषविली आहेत. गेल्या १० वर्षांपासून नाशिक मधील सर्वात जुन्या वाचनालया धुरा सांभाळली होती. दरम्यान दीर्घ आजाराने आज सकाळी औरंगाबादकर यांचं निधन झाले आहे.
आपल्या कुशल कामामुळे महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये विविध महाविद्यालये त्यांनी नावारूपाला आणले.. त्यांना आदर्श प्राचार्य, आदर्श प्रशासन अधिकारी व मुंबईचा समाजश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या काळात सार्वजनिक वाचनालयाने अनेक नवोपक्रम राबविले आणि वाचनालयाचे सांस्कृतिक कार्य पुढे नेले. त्यांच्या निधनाने सार्वजनिक वाचनालय व शिक्षण क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली
नाशिकमधील सावना वाचनालयाच्या जडणघडणीत औरंगाबादकर परिवाराचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.