महाराष्ट्रात ठाकरेंचा राज चालतो नाशिकच्या घटनेवरून शालिनीठाकरेंचा इशारा

नाशिक:-नाशिक मध्ये गुरुवारी हिंदी प्रसारणी सभेच्या वतीने कालिदास कला मंदिर सभागृहात (kalidas kalamandir nashik)प्रख्यात हिंदी कवी कुमार विश्वास(kumar vishwas) यांच्या उपस्थितीत कवी संमेलन (kavi sammelan)कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. हिंदी काव्य संमेलनाला आकारण्यात आलेले शुल्क आणि मराठी भाषिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने महाकवी कालिदास कला मंदिरात गोंधळ उडाला होता.

आयोजकांनी अरेरावी आणि मराठी भाषिकांना कार्यक्रमाला निमंत्रित केलेच नव्हते सांगितल्याने वादाचा प्रसंग उद्भवला पोलिसांचा हस्तक्षेप आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी येऊन केलेल्या घोषणाबाजीने अखेरीस आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. मराठी भाषकांना प्रवेश नाकारल्याने मराठी भाषिक आक्रमक झाले होते याच गोंधळा दरम्यान नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यादेखील कालिदास कला मंदिर येथे दाखल झाल्या होत्या.

यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी (mns)मराठी भाषेची गळचेपी सहन केली जाणार नाही म्हणून जोरदार घोषणाबाजी केली हीच गोंधळाची परिस्थिती पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत आयोजकांना हा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना केली होती त्यावरून आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली.

त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केला तर भाषकांना प्रवेश दिला नाही तर मनसे स्टाईलने सांगण्यात येईल अशी भूमिका मनसेच्या नेत्यांनी घेतली तर कार्यक्रमाला प्रवेश नाकारल्याने मराठी भाषिक कानी आयोजकांवर संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्याध्याक्षा शालिनी ठाकरे (shalini thakare)यांनी नाशकात मराठी माणसाला कार्यक्रमात प्रवेश नाही?
एवढा माज? कुमार विश्वासला जर हिंदी भाषिकांसाठी कार्यक्रम करायचे असतील तर दिल्लीत करावे. महाराष्ट्रात ही नाटके खपवून घेतली जाणार नाहीत. इथे ‘ठाकरेंचा’ राज चालतो. असा इशारा कालच्या घटनेवर शालिनी ठाकरे यांनी हिंदी भाषिकांना दिला आहे.