व्वा, कमालच! बागलाणच्या शेतकऱ्यांचे शिवरायांना अनोखे अभिवादन

नाशिक । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने मातीच्या वापरातून शिवाजी महाराजांची अतिशय रेखीव शिवचित्रकृती साकारण्यात आली आहे.

जिल्ह्यात आज सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अनेकजण वेगळंवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत आहेत. अशातच ज्या शिवरायांनी मातीसाठी आणि रयतेसाठी जीवाचं रान केलं त्या राईटच्या राजाला बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने अनोखे अभिवादन केले आहे. निव्वळ मातीचा वापर करून अनोखी शिवचित्राकृती साकारली आहे.

बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील शेतकरी चित्रकार किरण मोरे यांनी हि अनोखे अभिवादन केले आहे. किरण मोरे यांनी शेतातील माती आणि कांदा याचा वापर करून बंगल्यातील गॅलरीवर हि चित्राकृती साकारली आहे. हि चित्रकृती बारा बाय पंधरा फुटाची असून शिवरायांच्या भगव्या ध्वजात साकारली आहे. तर यासाठी सुरवातीला शेतातील काळी माती आणून चाळणीद्वारे बारीक करण्यात आली. त्यानंतर चित्राकृती साकारण्यात आली. त्याला कांद्याची बॉर्डर देण्यात आली. यासाठी मुलगी प्रगती, आणि पुतणे मोहित यांनी मदत केली.

बहुदा चित्रकार रंगाच्या माध्यमातून अनेक जण चित्र काढतात पण मी शेतकरी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चित्राच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करतो आहे. आज शिवजयंतीनिमित्त शेतकऱ्यांचे वाली शिवाजी महाराज यांना एक अभिवादन पार हि चित्राकृती साकारली असल्याचे शेतकरी चित्रकार किरण मोरे यांनी सांगितले.