तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व मुख्यमंत्री ठाकरे यांची बैठक

मुंबई | प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होत आहे.

तत्पूर्वी या दोघांमध्ये चाय पे चर्चा झाली. यावेळी अभिनेते प्रकाश राज, अमित ठाकरे हे देखील सोबत होते. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

दरम्यान या बैठकीनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्याला पाठिंबा दिला होता.

दरम्यान बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र करण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न असल्याने सर्वांचेच या भेटीकडे लक्ष लागून आहे.

सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची बैठक होत असल्याचे बोलले जात आहे.