नाशिक । प्रतिनिधी
डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर आज रात्री आठ च्या सुमारास मोटरसायकल अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहन मंगळु बागुल (20) दिनेश नामदेव ठाकरे(18) दोघे रा.घुलमाळ अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हे दोघे तरुण दुचाकीने (क्र. एमएच ४१ बीसी ८५५६) डांगसौंदाणे येथुन आपल्या गावी जात होते. यावेळी डांगसौंदाणे शिवारातील रघुनंदन फार्मच्या समोर आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. अपघात एवढा भीषण होता कि, दोघेही तरुण दुचाकीवरून फेकले गेले. यामध्ये दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सटाणा पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळविल्यानंतर सटाणा पोलिसांनी घटनास्थळी येत दोघे मृतदेह डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले तर पुढील तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनुमोलवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. जयंतसिंग सोळंकी करीत आहेत