धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण नंतर बलत्कार

मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला असून अल्पवयीन मुलीचे अपहरण करत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बलात्कार केला आहे. मुंबईतील वडाळा भागातून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी 5 सप्टेंबर रोजी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. वडाळा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेजवळ पीडित मुलगी पोहचली असताना संशयित आरोपीने तिचे अपहरण केले. संशयित आरोपी विशाल वीरकरने पीडितेला बोलेरो कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि तिला पुणे एक्स्प्रेस वे च्या दिशेने नेले. एक्स्प्रेस वे लगतच्या एका अज्ञात ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विशाल वीरकरविरोधात भारतीय दंड संहितेनुसार, कलम 363, 376, 323 आणि 506, पोस्को कायद्यातील कलम 4,8 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. पिडीतेला न्याय लवकर न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.

एकूणच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये, यासाठी महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढतच चालले असून यावर काही कडक पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. पुणे-मुंबई सारख्या महानगरांमध्ये तर हे प्रमाण अधिकच आहे. राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न कायम आहे.