धक्कादायक..! नाशिक मनपा आयुक्तांच्या नावानं मागितले पैसे

Edited By: Pavan Yeole

नाशिक : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून आता तर हद्दच झाली आहे . नाशिकमध्ये मनपा आयुक्तांच्या नावाने नागरिकांकडून पैसे उकळला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नाशिक शहरात महापालिका आयुक्तांच्या नावाने पैसे मागणारे मेसेज व्हाट्सअप वर फिरत आहेत. मनपा आयुक्तांच्या नावानं नागरिकांना गंडा घालण्यात येत आहे . या विरोधात नाशिक मनपा आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार असल्याचे भासवत अधिकारी नागरिकांना गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


व्हाट्सअप डी पी ला मनपा आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांचा फोटो ठेवून स्वतः आयुक्त असल्याचे भासविण्यात येत आहे . तसेच नागरिकांना लिंक पाठवत लिंक क्लिक करून पैसे पाठविण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. ह्या धक्कादायक प्रकाराविरोधात आता स्वतःहून मनपा आयुक्तांनी पोलिसात धाव घेतलेली आहे . चक्क मनपा आयुक्तांच्या नावाने नागरिकांची फसवणूक करून पैसे उकळणारा आहे. तरी कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.या प्रकारानंतर मनपा आयुक्तांकडून नाशिक शहरातील नागरिकांना फेक मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांची मागच्या काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे या आधी फुलकुंडवार सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई या पदावर सेवा बजावत होते. आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करीत फुलकुंडवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यामुळे शहरात विविध चर्चा रंगू लागल्या होत्या आणि तेव्हा देखील डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार चर्चेत आले होते त्यांतर आता पुन्हा एकदा मनपा आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्याने ते चर्चेत आले आहेत .

शहरात व्हाट्सअपवर फिरत असलेल्या फेक मेसेज विरोधात मनपा आयुक्तांनी पोलीस तक्रार केली असून या प्रकरणी पोलिसांनी कुठल्याही संशयीतास अटक केली नसून अधिक तपास करत आहेत.