धक्कादायक..! छेडछाड केल्याचा जाब विचारल्याने मुलीच्या आईची हत्या

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घडली आहे. मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणांना जाब विचारला म्हणून छेडछाड करणाऱ्या तरुणांनी अल्पवयीन मुलीच्या आईचीच हत्या केल्याची बाब समोर आली आहे . ही घटना बीड जिल्ह्यातील वानटाकळी तांडा येथे घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे .बीड जिल्ह्यात असलेल्या वानटाकळी तांडा येथील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून त्रास देणाऱ्या टवळखोरांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या आईची तीक्ष्ण हत्याराणे भोसकून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे.


अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आणि परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथील एक कुटुंब आठ दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी गेले होते. या दरम्यान त्यांच्या तीन मुली काळवटी तांडा येथे वास्तव्यास होत्या याच तांड्यावरील बबन चव्हाण यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीस विनाकारण भेटून छेडछाड करत त्रास दिला. ही घडलेली घटना आई-वडील देवदर्शन करून परत आल्यानंतर मुलींनी सांगितली त्यानंतर आई-वडिलांनी दोन दिवसांपूर्वी बबन चव्हाण यास जाब विचारला त्यांच्या शाब्दिक चकमक झाली. याचा राग मनात धरून काल बबन चव्हाण त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण आणि भाऊ सचिन चव्हाण यांच्यासह तिघांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन भांडण करण्यास सुरुवात केली.


यात प्रकरण वाढून मारहाण होऊ नये यासाठी नातेवाईकांनी त्यास खोलीमध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला या दरम्यानच संशयित आरोपीने दुसऱ्या रूम मध्ये असलेल्या मुलीच्या आईकडे जात त्यांच्या पोटात तीष्ण हत्यारांनी वार केला डोक्यात लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आरडा ओरडत झाला हा आरडाओरडा पाहून शेजारी धावून आले तेव्हा मारहाण करणाऱ्या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला पडलेल्या पीडित मुलीच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता यावेळी पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला.

यानंतर मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिया मांडला आरोपींना अटक करण्याची मागणी केली त्यानंतर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिले त्यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी चार-पाच पदके तयार करून आरोपींच्या मागावर शोध घेण्यासाठी धाडले यात मुख्य आरोपी बबन चव्हाण आणि त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी इतर चार संशयित आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली आहे या. प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.