Home » सिन्नर-शिर्डी महामार्गावर जनावरांची पोलिसांकडून सुटका

सिन्नर-शिर्डी महामार्गावर जनावरांची पोलिसांकडून सुटका

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे अवैधरित्या वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सिन्नर शिर्डी महामार्गावरून कत्तलीसाठी जनावरे कोंबून पिकअप शिर्डीकडे जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी फौजफाट्यासह सापळा रचला होता. दुपारी सिन्नर शिर्डी मार्गावर जाणाऱ्या वाहनांची तपासणीदरम्यान पिकअप टेम्पो वाहनचालकाच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पिकअप टेम्पो थांबवून तपासणी केले असता त्यात जनावरे कोंबून भरले असल्याचे आढळून आले.

दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते गादीवर ताबा मिळवत असताना गाडीच्या मागच्या बाजूने पॅकबंद बांधलेला पडदा खोलताच चालकाने पळ काढण्यास सुरुवात केली. तर दबा धरून बसलेलय एकास पकडून ताब्यात घेतले आहे. इम्रान सय्यद (३०) राहणार संगणमेर यास ताब्यात घेतले आहे. सदर जनावरे निर्दयपणे एकावर एक बांधून यामध्ये नऊ कालवडी व एक गोऱ्हा अशी होती.

या जनावरांची स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी केली. ही सर्व जनावरे धांगी जातीची असून बांधून एकावर एक ठेवत निर्दयपणे छळ करून कत्तलीसाठी जात असल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला होता. याबाबत अधिक तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करीत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!