नाशिक-पुणे रेल्वेसाठी ३१ मार्चपर्यंत जमिनींचे मूल्यांकन होणार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात जमिनीचे संपादन थेट खरेदी केली करून केले जाणार आहे त्यासाठी दर निश्चिती ची प्रक्रिया ही सर्वत्र समान ठेवले जाणार असून ती लवकरच तयार करत 31 मार्चपर्यंत सर्व ठिकाणचे दर जाहीर करावे असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ही आर्थिक तजवीज केली आहे त्यामुळे प्रकल्प खुर्चीसाठी आवश्यक भूसंपादन ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रक्रिया असल्याने वेळेत पूर्ण व्हावे यासाठी पवार यांनी सोमवारी ऑनलाईन बैठक घेतली त्यात 31 मार्च पर्यंत मूल्यांकन सूचना जाहीर करण्यात आल्या जिल्ह्यातील 24 गावातून महामार्ग जाणार असून या गावातील संपादित जमिनींचे मूल्यांकन ठरवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान हे मूल्यांकन जाहीर झाल्यानंतर ज्या गावातून तात्काळ प्रतिसाद मिळेल, तेथे त्वरित जमीन कशी खरेदी करावी, ती ताब्यात घ्यावी, यातून भूसंपादन प्रक्रिया गतिमान होईल आणि प्रकल्प उभारणीला ही वेळ मिळेल असे पवार यांनी सांगत अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत. दोन-तीन दिवसात काही गावांचे मूल्यांकन होऊ शकेल. या मार्गावरील गावांतील जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया सुरू करण्याची प्रशासकीय तयारी आहे.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच आता या जमिनीची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये खरेदीखत नोंदवले जातील आणि रीतसर संबंधित जमीन मालकांकडून ही जमीन रेल्वेमार्गासाठी खरेदी केली जाईल. असे प्रकल्पाच्या भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी सांगितले.