मोठी बातमी : राज्यात पुन्हा निर्बंध; नवी नियमावली जाहीर

नाशिक । प्रतिनिधी
सध्या सर्वकाही सुरळीत असतांना अचानक कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत देशातील राज्य सरकारला सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे.

दरम्यान राज्यभरात शाळा, सार्वजनिक ठिकाणे, मॉल, थिएटर आदी सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता नव्य व्हेरिएंटने घोळ घातला असून राज्य शासनाचे टेन्शन वाढले आहे. नव्या उपाययोजनां घेऊन प्रशासन सज्ज झाले असून राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे सावर्जनिक वाहतुकीत प्रवास करायचा असल्यास दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक असणार आहे. तर कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊन दंड वसूल करण्यात येणार आहे.

तसेच रिक्षा किंवा टॅक्शीत प्रेवश करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केलेला नसल्यास त्यास पाचशे रुपये दंड असणार आहे. तर दुकानात आलेल्या व्यक्तीने मास्क घातला नसेल तर पाचशे तर संबंधित दुकानदाराने मास्क घातला नसेल तर दहा हजारांचा दंड आणि मॉल्स मधील शॉप मालकाने मास्क घातला नसल्यास ५० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. राजकीय कार्यक्रमांना, सभांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर ५० हजारांचा दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.