विद्यार्थिनी झाल्या रणरागिणी! छेड काढणाऱ्या टवाळखोरांना दिला चोप

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या सावित्रीच्या लेकीनी छेड काढणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच दणका दिला आहे. विशेष म्हणजे या कामगिरीबद्दल भोसला मिलिटरी स्कूलकडून या विद्यार्थिनींना रामदंडी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, भोसला कॉलेजच्या काही विद्यार्थिनी पास घेऊन सोमेश्वर (Someshwar) येथे सहलीसाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर यातील काही विद्यार्थिनी बर्फाचा गोळा खाण्यास गेल्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी पाच ते सहा टवाळखोर उभे होते. त्यांनी या मुलींना टोमणे मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची मजल अपशब्द उच्चारण्यापर्यंत गेली. तरीही मुलींनी त्याकडे दुर्लक्ष गेले. शिवाय असे बोलू नका, अशी समज दिली. मात्र, तरीही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली.

दरम्यान मुली काही बोलत नाही पाहून टवाळखोरांची मजल वाढतच गेली. यातील एका बहाद्दराने तर आपल्या तोंडातील गुटखा मुलीच्या पायावर थुंकला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थिनी जाब विचारायला गेल्या. तेव्हा त्याने त्यांना धक्के मारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र, मुलीच्या संयमाचा बांध सुटला. सव्र्ह वेमुलींनी एकत्र टवाळखोरांना फैलावर घेत धु धु धुतले. मुलींचा रुद्रावतार पाहून या मुलांची पळता भुई थोडी झाली.

तसेच मुलींनी पोलिसांना सुद्धा सदर प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर टवाळखोरांचा समाचार घेतला.या मुलींसमोरच टवाळखोरांना उठाबशा काढायला लावल्या. विशेष म्हणजे या कामगिरीबद्दल भोसला मिलिटरी स्कूलकडून या विद्यार्थिनींना रामदंडी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.