कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधीपदी सुधाकर शिलाटे

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक 2022 ही आज (दि.०१ मार्च) रोजी दिंडोरी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी श्री राहुल आहेर व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ह्या निवडणुकीत सर्व पदांसाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली त्यात निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुधाकर रंगनाथ शिलाटे तालुका अध्यक्ष यशवंत पंढरीनाथ गायकवाड तालुका कार्याध्यक्ष म्हणून महेंद्र फुला गवळी तालुका उपाध्यक्ष म्हणून श्रीमती प्रियांका यशवंत कुडके, श्रीमती अस्मिता उत्तमराव अहिरे, श्रीमती उज्वला मनोहर गावित, तालुका सचिव म्हणून राहुल किसन राऊत तालुका खजिनदार म्हणून श्री प्रकाश विष्णू ठाकरे तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री संदिपकुमार भाऊराव बोरवे तर तालुका संघटक म्हणून श्री नितिन दिगंबर वसावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड झालेल्या पदाधिकारी यांचे उपविभागीय कृषी अधिकारी कळवण श्री राकेश वाणी साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री विजय पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाठे, श्री ललित सूर्यवंशी, प्रमोद गोलाईत अनिल साठे, कृषि पर्यवेक्षक श्री प्रशांत जाधव, विठ्ठल रंधे, पंडित कनोर, श्यामकांत पाटील, मंगेश जंगम, संजय सावंत, उत्तम भुसारे, सहाय्यक अधीक्षक सुधिर भालेराव आदि सह सर्व कृषि सहाय्यक बांधवांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत केले.

नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सर्व कृषि सहाय्यक बांधवांना सोबत घेऊन काम करू तसेच कृषि सहाय्यक बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन यावेळी दिले.