नाशिक । प्रतिनिधी
नाशिक शहरातील नागरिकांकडून अद्यापही पाणी पट्टी बिलासाठी उशीर केला जात असून अनेकदा विविध ऑफर देऊनही अनेकजण बिल अदा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेने पाणी पट्टी बिल भरण्यासाठी थेट अँपची निर्मिती केली आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या परवानगीनंतर ते नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केल्यानंतरही महापालिकेला पाणीपट्टी वसुलीत अडचणीचा सामना करावा लागतो. नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दोन लाख दहा हजार नळ जोडण्या आहेत. परंतु काहींकडून वेळीच देयके अदा केली जात नसल्याने कोट्यवधींची थकबाकी रखडते. अशाच नागरिकांमधील दुवा कमी करताना महापालिकेकडून विशेष अँप साकारण्यात आले आहे. या ॲपद्वारे थेट व्हाट्सअप वर महापालिकेची बिले पाठवली जाणार आहे. तसेच नागरिकांनाही याचा वापर करताना पाणीपट्टी बिलाची रक्कम ऑनलाइन स्वरूपात अदा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे यासंदर्भात सादरीकरण होऊन औपचारिक घोषणा केली जाणार आहे. महापालिकेतर्फे उपस्थित केलेल्या या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाणी मीटरचे रीडिंग मधून बिलाची मोजणी करण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच व्हाट्सअप ई-मेलच्या माध्यमातून नागरिकांना बिल प्राप्त करून घेता येणार आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात दोन लाख दहा हजार नळजोडण्या असून घरगुती नळ जोडणी धारकांना दर दोन महिन्यांनी आणि व्यावसायिक न जोडणी धारकांना दर चार महिन्यांनी पाणीपट्टीची बिले दिली जायला हवीत.
नाशिक महापालिकेच्या कर विभागांमध्ये सुमारे शंभर कर्मचारी असून त्यांच्यावर पाणीपट्टी सोबत घरपट्टी वसुलीची ही जबाबदारी असते. अशातच कर्मचाऱ्यांच्या मर्यादित क्षमतेमुळे पूर्ण क्षमतेने वसुली होताना दिसत नाही अनेक ठिकाणी चार सहा वर्षे उलटूनही पाणीपट्टी देखील मिळू शकत नाहीत. वेळेवर बिले पोहोचत नसल्याने वसुलीसाठी ही विलंब होतो. अशाच प्रभावी वापर करताना ही गैरसोय टळली जाणार आहे.
असा करता येईल वापर
नळ जोडणी धारकांना पाणी मीटर चे छायाचित्र काढून अपलोड करावे लागेल. त्यानंतर याद्वारे तात्काळ पाणीपट्टीची मोजणी होत बिल मिळू शकेल. याशिवाय आपल्या माध्यमातून महापालिका कर्मचारी देखील बिलाची आकारणी करू शकतील हा ॲप जीपीएस लग्न असल्यामुळे मिटर रिडींग चा घोटाळा करता येणार नाही, सादर करण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल.
पाणीपट्टी संदर्भातील ॲप्स करण्यात आली असून महापालिका आयुक्त रमेश पवार यांना सादर केले जाणार आहे. यानंतर त्यांच्या सूचनांनुसार दुरुस्तीनंतर ॲप सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिले जाईल.
- अर्चना तांबे, उपायुक्त महापालिका