टीईटी परीक्षा घोटाळ्याचं नाशिक कनेक्शन उघड; दोघांना अटक

नाशिक । प्रतिनिधी

टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam case) प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून या घोटाळ्याचे नाशिक कनेक्शनही (TET exam scam Nashik connection) समोर आले आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात नाशिकमधून (Nashik) दोन जणांना सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे.

टीईटी पेपर गैरव्यवहार जी ए सॉफ्टवेरच्या (G A Software) संचालक डॉ. प्रितीश देशमुख (Dr. Pritesh Deshmukh) याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या दोघा मुख्य एंजटना ३५० परीक्षार्थींचे ३ कोटी ८५ लाख रुपये देणाऱ्या दोघा शासकीय कर्मचाऱ्यांना पोलिसांनी नाशिकहून अटक केली आहे. टीईटी गुन्ह्यात १२ जणांना अटक केली असून, तब्ब्ल ४ कोटी ६८ लाख रुपयांचा माळ हस्तगत करण्यात आलं आहे.

सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. उत्तरानगर, नाशिक), स्वप्नील तिरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी न्यायालयाने ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात सांगितले कि, स्वप्नील पाटील शिक्षक असून सुरंजित पाटील टेक्निशियन आहे. त्यांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अंकुश हरकळ व संतोष हरकळ यांच्याशी संपर्क करून २०१८ /२०१९ या परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थ्यांना पात्र करण्यासाठी कट रचला.

सुरंजित पाटील याने १९ च्या परीक्षेसाठी २०० परीक्षार्थ्यांकडून प्रत्येकी ०१ लाख १० हजार रुपये घेऊन या परीक्षार्थ्यांची यादी व २ कोटी ३५ लाख रुपायी अंकुश व संतोष हरकळ यांच्याकडे दिल्याचे वेळोवेळी कबुल केले आहे. स्वप्नील पाटील याने १९ च्या परीक्षेला बसलेल्या १५० परीक्षार्थ्यांकडून प्रत्येकी ०१लाख १० हजार रुपये घेऊन त्यांची यादी व ०१ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम अंकुश व संतोष हरकळ याना दिली आहे.