आपल्याला काय बोलून मोकळ व्हायच मुख्यमंत्री बोलले. फडणवीस म्हणाले माइक सुरू आहे

मुंबई:- सध्या राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्नी धग अजूनही कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठकीच आयोजन केल होत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे पूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ‘आपल्याला काय करायचं’ ‘आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शब्द या व्हिडिओत ऐकू येत आहे. (ekanath shinde ) मुख्यमंत्र्यांच्या या शब्दाला दुजोरा देत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी ‘हो…. येस असं म्हटलंय. परंतु समोर मध्यम प्रतिनिधी आणि त्यांचे कॅमेरे असल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (devendra fadnavis )यांनी ‘माईक चालू आहे’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्त्यावरून विरोधक चांगलीच टीका करत आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे मराठा आरक्षणाबाबतची अनास्था दर्शवत असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईक वरील संवाद सोशल मीडियावरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून अत्यंत खोडसळ पणा विरोधक करत असल्याच प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे…

गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे पाटील(manoj jarange ) आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारने लवकरात लवकर जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

यासाठी राज्यभरातून विविध पद्धतीने जरांगे पाटलांना पाठिंबा दिला जात आहे. राज्य सरकारमधील मंत्री तसेच इतरही राजकीय नेते मंडळींनी जालन्यातील अंतरवाली येथे जात जरांगे पाटलांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे अशी त्यांना विनंती केली. मात्र मनोज जरांगे पाटीलांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही सरकारकडून जीआर येत नाही तोपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगितले आहे.

याप्रकरणी सोमवारी सह्याद्री अतिगृहावर(sahyadri gest house ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकी नंतर दरम्यान पत्रकार परिषदे आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलच वायरल होतं आहे.