नाशिक:- नाशिक शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख (HEMANT PARAKH) यांचं काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातून अपहरण झालं होतं नाशिक शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या पारक यांचं राहत्या घरासमोरून रात्रीच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती.
नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे दुसरीकडे त्या कार्यक्षमतेवर देखील प्रशिक्षण उपस्थित केले जात आहे. अशातच नाशिकच्या सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक हेमंत पार्क यांचे राहत्या घरासमोरून अनोळखी इसमांनी पिस्तूल चा धाक दाखवून अपहरण केल्यामुळे नाशिक शहरात एक खळबळ उडाली होती.
नाशिक शहर पोलिसांनी(NASHIK CITY POLICE ) अपहरण झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. आरोपी हे राजस्थान येथील जोधपूर भागातील असल्याची माहिती मिळाली. नाशिक शहर पोलिसांनी तीन दिवस अहोरात्र मेहनत करून संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांची गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सदर गुन्ह्यातील मास्टर माईंड अनिल खराटे मुख्य आरोपी महेंद्र बिष्णोई सह सात आरोपींना अटक केली आहे. सदर घटनेचा तपास नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव पोलीस सहाय्यक आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सह पथकाने कामगिरी केली.