राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा ? राजभवनाकडून मोठा खुलासा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार ही माहिती समोर आली. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राजभवनाने हे वृत्त फेटाळून लावल्याची माहिती आता (It is reported that the Raj Bhavan has rejected the reports that the Governor wants to be relieved of his post) समोर आली आहे. हे वृत्त तथ्यहीन असल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात राज्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले असताना राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा जवळच्या व्यक्तींकडे केली असल्याची माहिती होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची बातमी समोर आली होती. मात्र राज्याभावानाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. राज्यपाल यांची पदमुक्त होण्याची इच्छा असल्याची बातमी तथ्यहीन असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. तर राज्यपालांकडून काही महिन्यांआधीच तशी मागणी केली होती अशीही माहिती मिळाली आहे. राज्यपालांनी अशी इच्छा आपल्या जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त केल्याचही म्हंटलं जात होतं. मात्र या सर्व बातम्या तथ्यहीन आहे असं राजभवनाने सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ((Governor Bhagat Singh Koshyari)) हे अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. शिवरायांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी २ वेळा वादग्रस्त वक्तव्य केले. सावित्रीबाई फुले यांच्याबाद्द्लही बोलताना राज्यापालंची जीभ घसरली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल केलेले वक्तव्य देखील राज्यपालांना चांगलेच भोवले होते. आताही शिवाजी महाराजांबद्दल दुसऱ्यांदा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात असंतोष पाहायला मिळाला. अजूनही त्याचे पडसाद उमटत आहे. आज नाशिकमध्ये विराट हिंदू मूक मोर्चामध्ये देखील शिवरायांविरोधात केलेल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले दिसले.

या सर्व घडमोडी घडत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत असल्याची माहिती होती. तसे संकेत राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतः दिले असून त्यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यासोबतच त्यांचा पदभार त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात यावा अशीही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती होती. मात्र हे सर्व वृत्त आता फेटाळण्यात आले आहे.