नाशिकची घटना! लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, सोबत लाखोंची फसवणूक..

नाशिक : शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोबतच संबंधिताने महिलेची लाखोंची फसवणूकही केली आहे. ही धक्कादायक घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडलीय. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील मदिना चौक भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिडीत आणि संशियत आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असून पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला गेला.

सोबतच पिडीतेला अनेक वेळा मारहाण करत तिच्याकडून लाखोंची रक्कम उकळली असल्याचेही पिडीतेला फिर्यादीत म्हंटले आहे. आरोपीला घर घेण्यासाठी ३ लाख आणि एकदा बुलेट ही दुचाकी घेण्यासाठी ८० हजार रुपये तसेच पुन्हा दुसरी दुचाकी घेण्यासाठी ८० हजार मारहाण करत घेतले. पिडीतेला आता हे सर्व सहन न झाल्याने पिडीतेने पोलिसांत धाव घेत संशयीता विरोधात तक्रार नोंदवली आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, फसवणूक आणखी विवध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून घटनेचा कसून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.