डॉ. सुर्वणा वाजे प्रकरणात आणखी एक ट्विस्ट

नाशिक । प्रतिनिधी
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे व त्यांचे पती पती मुख्य संशयित संदीप वाजे यांचे मोबाईल टॉवर लोकेशन हे २५ जानेवारीच्या रात्री मुंबई- आग्रा महामार्गालगतच होते, यावर तपासातून पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडाचे दररोज नवनवीन पैलू उलगडत असून, वाजे दाम्पत्यांमध्ये होणाऱ्या कौटुंबिक कलहामध्ये केवळ वाजे यास दुसरे लग्न करण्याचे कारण वाजे यांनी लिहिलेली चिठ्ठी व मोबाईल संवादातून पोलिसांसमोर उघड झाले आहे. अंत्यत थंड डोक्याने संशयित संदीप याने सुवर्णां वाजेचा पूर्वनियोजित खुनाचा कट रचून तो तडीस नेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वाजेच्या मोबाईलमधील डिलीट केलेल्या डेटापैकी काही डेटा ग्रामीण सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. उर्वरित संपूर्ण डेटा फॉरेन्सिककडून जेव्हा प्राप्त होईल तेव्हा या हत्याकांडातील आणखी काही पैलू उघड होतील असे पोलिसांनी सांगितले आहे.

मयत सुवर्णा वाजे व संशयित संदीप वाजे यांचे मोबाईल टॉवर लोकेशन पडताळून बघितले. तांत्रिक विश्लेषणातून त्यांचे टॉवर लोकेशन घटनास्थळाच्या परिसरातील असल्याचे तपासात समोर आल्याचे समोर आले आहे. वाजे यांच्या कारमध्ये पोलिसांना आढळलेला भाला मोठा चाकूचा वापर सुवर्णां वाजे यांना ठार मारण्यासाठी केला गेला असावा आणि पुरावा पोलिसांच्या हाती लागू नये , म्हणून चाकू संशयित संदीप याने स्वतःच्या कारमध्ये लपविला असल्याण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गौळाणे ते रायगडनगरच्या दरम्यान सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घातपाताचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयित त्यांचा मृतदेह कारसह निर्जन ठिकाणी महामार्गालगत पेटवून दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.