पत्नीला विद्यार्थ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; पतीचे धक्कादायक पाऊल..

एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला दहावीच्या विद्यार्थ्यासोबत पतीने नको त्या अवस्थेत पहिल्याने पतीच्या डोक्यात राग गेला. या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. या घटनेतील आरोपी स्वताहून पोलिसांच्या स्वाधीन झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरदचंद्र पाल आणि त्याची पत्नी शाळेच्या बसवर नोकरी करत होते. शरद हा बस ड्रायव्हर होता, तर त्याची पत्नी बसमधल्या मुलांना स्टॉपवर बसमध्ये बसवायचे आणि सोडायचे काम करायची. दरम्यान, शरदची पत्नी एका दहावीच्या विद्यार्थ्याला त्याच्या घरापर्यंत सोडायला जायची. व त्याला सोडवून तिथूनच मी घरी जाईल असा बहाणा ती करायची.

पत्नी दररोज या विद्यार्थ्याला त्याच्या घरी सोडवायला जाते आणि तिथूनच आपल्या घरी का निघून जाते? असा प्रश्न शरदचंद्र याला पडला होता. घटनेच्या दिवशी त्याने पत्नीसह विद्यार्थ्याचा चोरून पाठलाग केला. घरी गेल्यावर शरदने जे काही पहिले ते थक्क करणारे होते. त्याने दरवाजातूनच पत्नीला आणि त्या मुलाला नको त्या अवस्थेत पाहिले.

शरदच्या डोक्यात राग गेला, तो पत्नीच्या आधी घरी पोहचला. त्याने मद्यप्राशन सुद्धा केले. यावेळी पत्नी घरी आल्यानंतर त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्याने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. यानंतर शरद पोलीस ठाण्यात जाऊन साहेब मला अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे, असे म्हणत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

दरम्यान, या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसही चक्राऊन गेले असून त्यांनी शरदला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.