नाशिकमधील या तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता

राज्यात माघील वर्ष्याच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे अनेक ठिकाणी पिकं पाण्याअभावी करपली गेली आहेत. ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी वर्गात मोठी चिंता वाढली आहे.

पावसाच्या ऑगस्ट महिनाभराच्या उघडिपीमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नाशिक, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली आहे. अजून ९ तालुक्यांतील ६८.२० टक्के म्हणजेच ४,२६,७८९.४४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके वाचण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील १०६ महसूल मंडळांपैकी ७ मंडळांत २५ टक्क्यांहून कमी, ३६ मंडळांत ५० टक्क्यांपर्यंत, ४७ मंडळांत ७५ टक्क्यांपर्यंत, १२ मंडळांत १०० टक्के तर ४ मंडळांत सरासरीहून अधिक पाऊस झाला.

हेही वाचा: बागलाण: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

यावर्षी सलग २६ दिवस ९० मंडळांत २.५ मिमी इतका पाऊस न झाल्याने या महसूल मंडळांत ‘ड्राय स्पेल’ म्हणजेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ओढवली आहे.

याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या एका तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व १४ तालुक्यांतील खरीप पिके जवळपास करपली गेली आहेत. नाशिक जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार २४९ शेतकऱ्यांनी ३ लाख ९९ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढलेला होता.

त्यापैकी तब्बल ९७.८४ टक्के म्हणजेच २ लाख ९२ हजार २४९ शेतकऱ्यांच्या ९८.०२ टक्के म्हणजेच ३ लाख ९१ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील विमा संरक्षित पिके वाया गेली आहेत. आता इथून पुढं शेतकऱ्यांना विमाचे पैसे मिळतील का? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यानं उभा आहे .

खरीप हंगाम १०० टक्के वाया गेलेले तालुके

तालुकापावसाची टक्केवारीपेरणी (हेक्टर)
चांदवड४४.८४४०,२२०.०८
सिन्नर४५.३७४४,४७४.८७
नांदगाव४६.७६५८,७८६
नाशिक४९.०७९,६६८.५०
इगतपुरी४९.३८३३,२५८.९०