राज्य मंत्रीमंडळ बैठकीत ‘हे’ महत्वाचे निर्णय झाले.

संभाजीनगर:- मराठवाड्याच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगर(chatrpati sambhajinagar) येथील सुसज्ज स्मार्ट सिटी कार्यालयात(smart city office) राज्य मंत्री मंडळाची  आज बैठक(cabinet meting) झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासह सारकारमधील मंत्री आणि अधिकारी संभाजीनगरात दाखल झाले होते. मराठवाड्याच्या केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरात तब्बल ७ वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली असून  यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

राज्यमंत्रीमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले (cabinet meeting decision in chtarapti sambhajinagar)

मराठवाड्यातील दूध उत्पादनाला गती देण्याच्या प्रस्तावित योजनेसाठी ३ हजार २२५ कोटींचा निधीला मंजुरी दिली आहे.

नांदेड मधील गोदावरी घाट साबरमती नदीच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट म्हमऊन विकसित करण्यासाठी १०० कोटी प्रस्तावित

तुळजा भवानी मंदिर विकासकामांसाठी १३०० कोटीरुपये मंजूर करण्यात आले आहे.(tuljabhavani tempal)

मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

पुणे – संभाजीनगर महामार्गावर इंटिलिजेंट ट्राफिक व्यवस्थापन सिस्टीम बसवण्यासाठी १८८ कोटी मंजूर

मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी प्रकल्पासाठी २८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यासाठी पाणी वळवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

बारा जोतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याच्या कामाकरिता १५० कोटी तसेच दुष्काळग्रस्त परिस्तिथी ला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यासाठी राज्य सरकारने ४५ हजार कोटींचा निधी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली

अशा विविध विकास कामांसाठी मंजुरी  तसेच निधीची घोषणा आज संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.