सहारा सर्वांगीण विकास संस्थेचा “हा”अनोखा उपक्रम राज्यभरात होतय कौतुक

अहमदनगर:- बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन या सणाची ओळख आहे.(RAKSHABANDHAN ) या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधत असते परंतु यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील सहारा सर्वांगीण विकास संस्था आणि संविधान गट यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी व्यंकनाथ येथे “मिळून साऱ्या जणी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात “महिलांनी महिलांनाच राख्या” बांधत रक्षाबंधन सण साजरा केला. महिलांनी महिलांनाच राख्या बांधून जगासमोर एक ठसा उमटवला आहे. “मिळून साऱ्या जणी” या कार्यक्रमात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजर करून आपलेपणाची भावना, आपुलकी नात्यात बांधले जाणे एकमेकांची रक्षण करणे, विधवा गरजू महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते असा संदेश दिला.

रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाला राखी बांधून(SISTER – BROTHER ) त्याचे औक्षण करत असते. मात्र सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या माध्यमातून पाच गर्भवती महिलांचे संरक्षण आणि पाच महिलांनीच महिलांना राख्या बांधून संरक्षणाची शाश्वती दिली. असे म्हटले जाते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एका स्त्री चा हात असतो. परंतु असे फारच कमी पुरुष असतात की जे स्वतः अंधारात राहून बायकोला प्रकाशात आणतात. सध्या कुंडली बघताना नवरा बायकोची नव्हे तर सासु सुनेची बघावी तरच महिला या आपल्या कुटुंबात सुखी राहतील. महिला स्वतःच्या पायावर उभे राहूनही आत्महत्या का करतात असा प्रश्न सुवर्ण पाचपुते यांनी केला.(WOMAN SUSIED)

सहारा संस्थेच्या विश्वस्त संध्या काकडे, सुनीता उंडे ,संगीता घोडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संध्या काकडे, नितीन नीता जठार, अनुराधा काकडे, पूजा साळवे यांनी प्रयत्न केल्याचे सहाराचे संस्थापक अध्यक्ष संतोष भोसले यांनी सांगितले.

सहारा सर्वांगीण विकास संस्थेने महिलांनी महिलांनाच राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले याबद्दल त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक होत आहे.