‘अशा धमकी पत्रांना घाबरत नाही’, ‘त्या’ पत्रावर महापौरांची प्रतिक्रिया

नाशिक । प्रतिनिधी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. त्याचबरोबर या पत्रात कुटूंबाला संपविण्याचा इशारा देण्यात आलं असून अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप आमदार आशीष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये महिलांवरुन वाद झाला होता. या वादानंतर त्यांना हे पत्र आल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पत्रात महापौर यांच्या परिवाराला गोळ्या घालून संपवण्यासह अश्लील भाषेचा वापर केला आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महापौर किशोर पेडणेकर यांच्या महापौर बंगल्यावर आलेल्या पत्रांपैकी हे एक पत्र आहे. त्यावरचा पत्ता चुकीचा होता, पण ते पत्र येथे आले आहे. पत्रामध्ये शिवीगाळ केली आहे, तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर झाल्यानंतर दुसऱ्यांदा धमकी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या पत्र प्रकारणांनंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘माझा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, पण मी शिवसेनेची कार्यकर्ता आहे,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. या पत्रानंतर मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.