देवळाली लष्करी परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या देवळाली लष्करी छावणी परिसरात आठ दिवसांत तीन तोतया अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आठ दिवसापुर्वी आर्मीचा ड्रेस घालून फिरणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. तर आता अजून दोन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद असद मुजिबुल्लाखान पठाण (रा. रेहमान नगर, देवळाली कॅम्प) आणि आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खान (रा. आडकेनगर, देवळाली कॅम्प) अशी दोघ संशयित आरोपीचे नाव असून दोघही देवळाली कॅम्प येथील राहणारे आहेत.

नाशिकचा देवळाली कॅम्प भाग हा लष्कर परिसर म्हणून ओळखला जातो. देवळाली परिसरात असलेला हा संपूर्ण लष्कराचा भाग एक प्रतिबंधित आणि संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याकडे असलेल्या विविध आधुनिक आणि युद्धासाठी वापरण्यात येत असलेल्या तोफांसह इतर शस्त्रास्त्रांच प्रशिक्षण दिलं जाते.

मात्र अशा संवेदनशील परिसरात गेल्या आठ दिवसात तीन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर या तिघांची प्रशासनाकडून कडून चौकशी केली जात आहे. मात्र या घटनेने परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.